माहिती अधिकार अधिनियम, २००५, मधील तरतुदींची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने कामगार आयुक्तालयाद्वारे त्वरित पाऊले उचलण्यात आलेली आहेत. सहाय्यक जनमाहिती अधिकारी, राज्य जनमाहिती अधिकारी, आणि अपिलीय अधिकारी, यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
भारताचा कोणताही नागरिक रु.१०/- चा कोर्ट फी स्टँप लावलेल्या अर्जाद्वारे आवश्यक ती माहिती प्राप्त करून घेऊ शकतो. संबंधित माहिती ३० दिवसांच्या आत उपलब्ध न झाल्यास, किंवा सदर माहिती अपुरी वा दिशाभूल करणारी असल्यास, माहिती अधिकार्याच्या निर्णयाने बाधित झालेली व्यक्ती सदर माहिती प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत रु.२०/- चा कोर्ट फी स्टँप लावलेल्या अर्जाद्वारे अपिलीय अधिकार्याकडे पुनरावेदन करू शकते.
अपिलीय अधिकार्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध, सदर निर्णय प्राप्त झाल्यापासून ९ दिवसांच्या आत, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त, १३वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मंत्रालय, मुंबई ३२, यांच्याकडे द्वितीय पुनरावेदन करता येते.
महितीचा अधिकार अधिनियम-2005 च्या कलम 4(1) (ख) मधील 17 मुद्द्यांची महिती
अ. क्र.
विषय / शीर्षक
डाउनलोड
1
माहिती अधिकारी/सहायक अधिकारी/अपिलीय प्राधिकारी
2
स्वयंप्रेरित प्रकटीकरण
3
उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग,मंत्रालय (खुद्द)
4
कामगार कल्याण मंडळ
5
बाष्पके संचालक
6
कामगार आयुक्त
7
औद्योगिक न्यायालय
8
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई
9
श्रम विज्ञान संस्था
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी कामगार विभाग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.